शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

पर्यटक कराचेही होणार ‘ऑडिट’; ग्रामसेवकाला द्यावा लागणार कामांचा हिशेब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 7:10 PM

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वसूल करण्यात येणाऱ्या पर्यटक कराच्या उत्पन्नातून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असून, दरवर्षी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जमा रकमेचे स्वतंत्र लेखापरीक्षण केले जाणार आहे.

औरंगाबाद : पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वसूल करण्यात येणाऱ्या पर्यटक कराच्या उत्पन्नातून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असून, दरवर्षी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जमा रकमेचे स्वतंत्र लेखापरीक्षण केले जाणार आहे. याची एक प्रत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक राहणार आहे, असे जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषदेने अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी पर्यटक कर आकारण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी एक-दोन दिवसांत पाठविला जाणार आहे. तथापि, पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून आकारले जाणारे तिकीट वेगळे आणि हा नव्याने आकारला जाणारा कर वेगळा असेल. यामुळे भविष्यात पर्यटकांचा ओघ कमी होईल का, वसूल केल्या जाणाऱ्या पर्यटक करातून ग्रामपंचायतींमार्फत खरेच विकास कामे केली जातील का, हा कर आकारणे योग्य की अयोग्य, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 

यासंदर्भात जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी सांगितले की, पर्यटक कर वसूल करण्यासंबंधी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात अटी-शर्थी नमूद करण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायतींमार्फत हा कर वसूल केला जाणार असला तरी त्यावर जिल्हा परिषदेचे पूर्ण नियंत्रण असेल. ग्रामसेवकांना दरमहिन्याला पर्यटक कराबाबतचा आढावा जिल्हा परिषदेला सादर करावा लागेल. जमा करण्यात येणाऱ्या करापैकी २५ टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींना, तर उर्वरित ७५ टक्के रकमेतून पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. यामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी यंत्रणा, रस्ते आदींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतचा हिशेब ग्रामसेवकांना द्यावा लागणार आहे. 

पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रौढ पर्यटकांना ५ रुपये, तर ६ ते १२ वयोगटातील मुलांना ३ रुपये कर आकारला जाणार आहे. शैक्षणिक सहलीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अवघा १ रुपया कर आकारला जाणार आहे. पर्यटक कराची आकारली जाणारी रक्कम अत्यंत कमी असल्यामुळे पर्यटकांना तो बोजा वाटणार नाही, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या निर्णयाची माहिती नाहीजिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कर आकारण्यात यावा, असा काही निर्णय घेतला आहे याविषयी काही माहिती नाही. असा काही निर्णय आमच्यापर्यंत आल्यास त्याविषयी वरिष्ठ स्तरावर कळवले जाईल. -अजित खंदारे, सहायक संचालक, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय, औरंगाबाद.

पर्यटनावर परिणाम नाहीजिल्हा परिषदेने पर्यटन कर आकारण्याचा निर्णय घेतला असला तरी तो कर अत्यंत कमी आहे. प्रौढांसाठी ५ रुपये, मुलांसाठी ३ रुपये असे या कराचे स्वरूप आहे. पर्यटनासाठी निघालेले पर्यटक एवढ्या कमी किमतीचा विचार करत नाहीत. त्यामुळे या करामुळे पर्यटनावर काही परिणाम होईल, असे वाटत नाही. त्या उलट या कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पर्यटन स्थळावर पर्यटकांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध करता येईल, स्वच्छता राखता येईल.- नितीन मुंडावरे, प्रादेशिक अधिकारी, एमटीडीसी

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदtourismपर्यटनTaxकर