औरंगाबाद : बीबी का मकबऱ्यातील अनेक वर्षांपासून बंद पडलेले ६१ कारंजे प्रजासत्ताक दिनापासून पुन्हा झाल्याने खळखळणाऱ्या पाण्यासह ७२५ दिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळलेला मकबऱ्याचे सौदर्यांने डोळ्यांचे पारणे फेडले. वेरूळ, अजिंठा लेणी पाहून शहरात रात्री मुक्कामी येणाऱ्या पर्यटकांना आता रात्री लख्ख प्रकाशात उजळलेल्या ‘दख्खनचा ताज’ अर्थात बीबी का मकबऱ्याचे सौंदर्य रात्री १० वाजेपर्यंत न्याहाळता येणार आहे. गुरूवारी २२ हजार पर्यंटकांना या सौदर्यांने भूरळ पाडली.
सुमारे २० लाख रुपयांचा खर्च करून संपूर्ण बीबी का मकबऱ्याच्या मुख्य स्मारक, ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा दोन्ही बाजुंचा रस्त्यावर, प्रवेशद्वारावर ७२५ दिव्यांनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच समोरच्या बाजुचे ६० कारंजे आणि मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोठा कारंजा असे छत्री सारखा तर दुसरा उंच उडणारा अशा दोन प्रकारचे ६१ कारंजे सुरू करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमीत्त या कारंज्यांवर तिरंगी विद्युत रोषणाई पर्यंटकांना भूरळ पाडणारी होती.
२२ हजार पर्यंटकांनी गजबजला मकबराबीबी का मकबरा येथे यापुर्वीही लाइट्स होते. परंतु ते केवळ स्मारकावर आणि मोजके होते. आता चारही बाजुने रोषणाई, कारंजे सुरू केल्याने पर्यटकांना रात्रीच्या वेळी हे स्मारक व परिसर दोन्ही पर्यटकांना भुरळ पाडली. गुरूवारी मकबऱ्यात प्रवेशासाठी सुमारे ७ हजार देशांतर्गत पर्यटकांनी तर ३० विदेशी पर्यटकांना तिकिट विक्री करण्यात आली. त्याशिवाय १५ हजाराहून अधिक मोफत प्रवेश दिलेल्या १५ वर्षाखालील शाळकरी विद्यार्थ्यांनी मकबरा गजबजला होता. अशी माहीती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहाय्यक संजय रोहणकर यांनी दिली.
साफसफाई, लोकार्पण अन् ‘इनायत’ध्वजारोहण, त्यानंतर औरंगाबाद परीमंडळाचे सुमारे २० अधिकारी कर्मचारी, ४ जेसीबीच्या सह्याने मकबरा आणि लेणी रस्त्यालगतचे मैदानानाची साफसफाई करण्यात आली. मकबऱ्यावर चारही बाजुने विद्युत रोषणाई आणि कारंजे सुरू करण्याचे सुमारे २० लाख रुपयांचे काम अधिक्षक डाॅ. मिलनकुमार चावले यांनी हाती घेतले होते. ते काम पुर्ण झाल्याने प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त साधून या कामाचे लोकार्पण विभागीय निदेशक डाॅ. नंदीनी साहू यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. यावेळी महागामीतर्फे इनायत विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण महागामी गुरूकुलच्या गुरू पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांनी शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण झाले.
तो प्रस्ताव अजून थंड बस्त्यात...केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी २०२० मध्ये मांडलेल्या विद्युतरोषणाईच्या संकल्पनेतून स्टॅच्यु ऑफ युनिटीमध्ये विद्युत रोषणाईचे काम केलेल्या संस्थेने शहरात येऊन बीबी का मकबरा, घृष्णेश्वर, दौलताबाद किल्ला येथे सर्वेक्षण करून आकर्षक व अत्याधुनिक विद्युत रोषणाईचा प्रकल्प तयार केला. बीबी का मकबरासाठी सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च त्यासाठी अंदाजित करून केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी केली. केंद्र व राज्याच्या पर्यटन विभागाकडून यासंबंधी कोणताही निर्णय न झाल्याने तो प्रस्ताव थंड बस्त्यात पडून आहे.
बाग, कारंज्यावर पाणीसंकट अटळमनपाकडे पाण्यासाठी पुनर्वापराच्या पाण्याची स्वतंत्र लाईन टाकुन देण्यासाठी एएसआयकडून पाठपुरावा सुरू आहे. मनपाला निधी देवून ते काम करून घेण्यासाठी यापुर्वीच चर्चा झाली. मात्र, त्यासंबंधी निर्णय न झाल्याने येत्या उन्हाळ्यात मकबरा परीसरातील बाग, झाडे, कारंज्यावंर पाणीसंकट अटळ आहे.