शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
3
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
4
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
5
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
6
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
7
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
8
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
9
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
10
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
11
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
12
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
13
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
14
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
15
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
16
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
17
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
18
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
19
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!
20
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video

बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच

By संतोष हिरेमठ | Updated: November 23, 2022 19:29 IST

अवघ्या १० मिनिटांचे अंतर, तरीही ‘बीबी का मकबरा’ पाहणाऱ्या ९० टक्के पर्यटकांची लेण्यांकडे पाठ

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : ‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध ‘बीबी का मकबरा’ पाहून पर्यटकांच्या मुखातून आपसूकच ‘वाह ताज...!’ असे शब्द बाहेर पडतात, मात्र बीबी का मकबरा पाहणारे जवळपास ९० टक्के पर्यटक अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावरील औरंगाबाद लेण्यांकडे जातच नसल्याची परिस्थिती आहे. अजिंठा, वेरूळ लेण्यांप्रमाणेच औरंगाबाद लेणीची माहितीही देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.

पर्यटनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तू आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ‘मस्ट सी’ म्हणजे ‘आवर्जून बघावीत’ असे ऑनलाइन पोर्टल बनविले. भारतात आल्यावर पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी, अशा पर्यटनस्थळांची यादी पोर्टलवर देण्यात आली. यात औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबीका मकबरा आणि औरंगाबादची लेणी यांचा त्यात समावेश आहे. बीबी का मकबरा येथे ऑक्टोबर महिन्यात एक लाखावर पर्यटकांनी भेट दिली; मात्र येथूनच अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील औरंगाबाद लेण्यांना ऑक्टोबरमध्ये केवळ १० हजार ६४ पर्यटकांनी भेट दिली. पुरेशा प्रमाणात माहितीच पोहोचत नसल्याने प्राचीन पर्यटन स्थळापासून पर्यटक वंचित राहत असल्याचे चित्र आहे. पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जात असल्याचे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सांगतात. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त यासाठी यापुढे आणखी प्रयत्नांची गरज आहे, असेही इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासकांनी म्हटले.

पर्यटकांपर्यंत माहिती पोहोचविण्याची गरजऔरंगाबादेतही लेणी आहेत, हे अनेक पर्यटकांना माहीतच नसते. बीबी का मकबरा पाहणारे काही पर्यटकच औरंगाबाद लेणी पाहतात. विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बीबी का मकबरा येथे औरंगाबाद लेण्यांसंदर्भात व्यापक स्वरूपात माहिती देण्याची सुविधा केली पाहिजे. दर्शनी भागात फलक लावले पाहिजेत. औरंगाबाद लेण्यांकडे पर्यटकांना आकर्षित केले पाहिजे.- डाॅ. कामाजी डक, पुरातत्त्व अभ्यासक

बीबी का मकबरा येथे भेट देणारे पर्यटकमहिना- भारतीय पर्यटक-परदेशी पर्यटकएप्रिल-४८,१४७-१३७मे-१,०३,३२९-११९जून-९५,१४८-१५९जुलै-८२,३९८-१६६ऑगस्ट-६४,७६२-१२२सप्टेंबर-७०,२६९-३०७ऑक्टोबर-१,०७,०२८-३४५एकूण-५,७१,०८१-१३५५

औरंगाबाद लेणी येथे भेट देणारे पर्यटकमहिना- भारतीय पर्यटक-परदेशी पर्यटकएप्रिल-५,०७३-६मे-७,२७६-९जून-८,९६१-१३जुलै-१५,५११-२१ऑगस्ट-८,१४९-२३सप्टेंबर-९,०२७-३९ऑक्टोबर-१०,०६४-४६एकूण-६४,०६१-१५७

टॅग्स :Bibi-ka-Maqbaraबीबी का मकबराAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन