सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरेच्या प्रवाहाचा जोर कमी झाला तर तीन दिवसामध्ये वाहून गेलेला पूल वाहतुकीसाठी पुन्हा तयार करता येईल. रस्ते बांधणीसाठी मोठी यंत्रणा असलेल्या आय. आर. बी. च्या अभियंत्यासोबत या पुलाची पाहणी करुन त्यांच्याशी चर्चा केली. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर आणि पावसाचा अंदाज घेऊन हे काम केले जाईल, अन्यथा मोठा पाऊस झाला तर तो पुन्हा वाहून जाण्याची शक्यता आहे. तीन दिवसामध्ये हा पर्यायी रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल, असे जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी आय. आर. बी. च्या तज्ज्ञांसोबत बिंदुसरा नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. प्रत्यक्ष काम सुरु केल्यास तीन दिवसात हा पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी तयार होईल, असे आय. आर. बी. च्या अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले. अद्यापही नदीच्या प्रवाहात जोर आहे आणि पुलाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अधूनमधून पाऊस सुरु आहे.वरील भागातील बिंदुसरा धरण, डोकेवाडी तलाव आणि बंधारे भरल्यामुळे पडणाºया पावसाचे पाणी यापेक्षाही अधिक वेगाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रवाहाच्या वेगासमोर नवीन केलेला रस्ताही टिकणार नाही.पावसाचा अंदाज घेऊनच लगेचच वाहून गेलेल्या रस्त्याचे काम सुरु केले जाईल. नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यावेळी बोलतानाकेले.
...तर तीन दिवसात मुख्य मार्गावरुन वाहतूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:10 AM