जालना : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून वाहनांची चोरी करून जालना जिल्ह्यात वाहने विकणारी टोळीचा तालुका जालना पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीच्या ताब्यातून आठ दुचाकी आणि दोन टॅक्टर असा १५ लाख १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन बारी म्हणाले की , जालना जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीस गेल्याच्या तक्रारी तालुका जालना पोलिस ठाण्यात दाखल होत्या. पोलीस पथक नेमून वाहनांचा तपास करण्यात आला. गुप्त माहितीवरून या टोळीतील कैलास विठ्ठल काजळकर (२७) रामकिसन पंडीत सिरसाठ (२५) मनोहन शेषराव जाधव (४४) या तिघांना पोलिसांनी अटक केली. तिघे वाहनचोर शहरासह इतर जिल्ह्यातून चोरीचे वाहने आणून रामकिसन पंडीत सिरसाठ यांच्या कुंभेफळ येथील गट क्रमांक १५९ शेतात ठेवत होते. योग्य भाव मिळाल्यास ग्राहकांना शेतात नेऊन ते वाहन दाखवित. त्यानंतर विक्रीचा व्यवहार होत असे.
वाहनचोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: April 15, 2017 11:45 PM