औरंगाबाद - लासूर स्टेशनजवळ रेल्वे रुळला तडा जाण्याची घटना घडली. मात्र हा प्रकार एका तरुणाच्या लक्षात आली. या तरुणाच्या सतर्कतेने सणासुदीच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली आहे.
काल रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी ७:२० वाजता लासूर ते पोटूळ स्टेशनदरम्यान नरसापूर- नगरसोल सुपरफास्ट एक्सप्रेस जात असताना जोरदार आवाज झाला. जवळच त्याच्या शेतात काम करणार महेंद्र कुकलारे या तरुणाने त्याचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच रेल्वेप्रमुख संतोषकुमार सोमानी यांना सांगितले.
आवाजामुळे पाहणी केली असता रेल्वे रुळाचा तुटलेला दिसला. यावेळी महेंद्रला लाल रंगाचे कापड वापरण्यास सांगितले असता त्याने स्वतःचा लाल रंगाचा शर्ट काढून सुरक्षेच्या दृष्टीने रुळावर उभा राहिला. या घटनेची रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी आले. काही वेळेतच रुळाची दुरुस्ती करण्यात आली. या मार्गाने धर्माबाद - मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस, अमृतसर -नांदेड सचखंड, नगरसोल - नरसापूर, मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस धावणार होत्या.