शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

रेल्वेचा प्रवास 22 तासांचा, टेस्टिंगसाठी दीड तास, सोशल डिस्टन्सचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 1:11 PM

सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांची तपासणी, अनेकांचे घेतले स्वॅब

ठळक मुद्देरेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधातपासणी करताना सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही.

औरंगाबाद : दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशनवर आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. तब्बल २२ तासांचा प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना दीड तास रांगेत ताटकळावे लागत आहे. सोशल डिस्टन्सचेही पालन होत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. शिवाय इतर रेल्वेंतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नसल्याने कोरोना वाढीचा धोका नाकारता येत नाही.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने रेल्वे सेवाही बंद करण्यात आली होती. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करून काही मार्गांवर रेल्वे सेवा केंद्र शासनाने सुरू केली होती. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता दररोज अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. सचखंड एक्स्प्रेससह सध्या मुंबई आणि हैदराबादसाठी विशेष रेल्वे धावत आहे; परंतु केवळ सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यातून कोरोनाबाधितांचा आकडा समोर येत आहे.

रेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधाऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दिल्ली येथून सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेकडून पथक नेमण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची माहिती नोंदविल्यानंतर रेल्वे स्टेशनवर तैनात केलेल्या पथकाकडून तपासणीसाठी नाकातील नमुना घेतला जातो. त्यानंतर प्रवासी रवाना होतात. अहवालाची माहिती प्रवाशांना नंतर कळविली जाते.

टेस्टिंगसाठी लागतो वेळटेस्टिंगसाठी प्रवाशांना जवळपास दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तपासणीसाठी केवळ एकच पथक राहिले तर हा वेळ आणखी वाढतो. शिवाय तपासणी करताना सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. प्रवासी रांगेत अगदी एकमेकांच्या जवळ उभे असतात. त्याकडे कोणाचे लक्ष जाताना दिसत नाही. त्यातूनही कोरोनाचे आमंत्रण मिळू शकते.

झांसीहून औरंगाबादला कामासाठी आलो आहे. रेल्वे आल्यानंतर इथे तपासणी होणार असल्याचे कळाले. त्यासाठी रांगेत उभा राहिलो. जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर माझा नंबर आला आणि तपासणीसाठी नमुना घेण्यात आला.-अमनाथ गुप्ता, प्रवासी

मथुराहून आलो आहे. तपासणीसाठी एक तास रांगेत उभे राहावे लागले. एक तास रांगेत गेला; परंतु तपासणी होणे अधिक गरजेचे आहे. प्रशासन जे काम करीत आहे, ते योग्यच वाटते. -विशाल सिंह, प्रवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनcorona virusकोरोना वायरस बातम्या