राहुल गायकवाड, प्रशिक्षणप्रमुख धोंडिरामसिंह राजपूत यांनी प्रशिक्षण दिले. तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींमध्ये १ लाख ७४ हजार २९४ मतदार असून, १५ जानेवारीला ते आपला
मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीसाठी ३७२ मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. राहुल गायकवाड यांनी मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, क्षेत्रीय अधिकारी यांची कर्तव्ये व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यात ई.व्ही.एम.च्या माहितीसह इतर मार्गदर्शन करण्यात आले. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दुसरे प्रशिक्षण गुरुवारी होणार आहे. यावेळी नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, प्र. गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, सहायक एम.आर. गणवीर, दुसिंग, संतोष जाधव, प्रवीण पंडित आदी उपस्थित होते.
- कॅप्शन :
प्रशिक्षणास उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार राहुल गायकवाड यांच्यासह इतर कर्मचारी.