मृत्युंजय दूत संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टिकोनातून महामार्ग पोलीस केंद्र खुलताबाद हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वर सराई, भडजी, ममनापूर आणि खुलताबादेत नवीन मृत्युंजय दूतांची निवड करून त्यांना पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस निरीक्षक नंदिनी चांनपुरकर, सपोनि सुरेश भाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सराईत वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे, मोनाली माळी यांनी १४ मृत्युंजय दूतांना मार्गदर्शन केले. यात शकील शेख, सुदाम नागे, विजय भाले, अविनाश नागे, किशोर नागे, दिलीप खंडाळकर, ज्ञानेश्वर नागे, सागर होळकर, सुभाष नागे, भगवान नागे, काकासाहेब नागे, दिलीप नागे, जगन्नाथ जाधव, आजिनाथ नागे यांना अपघातग्रस्त व्यक्तींना कशा पद्धतीने मदत करायची याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रत्येक मृत्युंजय दूत यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉस्पिटल, रुग्णवाहिका यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. यावेळी पोहेकॉ बापूसाहेब चव्हाण, गौतम खरात, संदीप दुबे, पोलीस मित्र शांताराम सोनवणे आदी उपस्थित होते.
- कॅप्शन : सराईत महामार्ग पोलीस मदत केंद्रातर्फे मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण देताना सुरेश भाले, डॉ. बलराज पांडवे आदी.