शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

विद्यापीठात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खांदेपालट; विभागप्रमुखही बदलले

By राम शिनगारे | Published: October 18, 2023 12:24 PM

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशाने कुलसचिवांनी बदल्यांचे आदेश जारी केले.

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, काही विभागप्रमुखांचे खांदेपालट करण्यात आले. त्यात १० अधिकारी आणि तीन विभागप्रमुखांचा समावेश असल्याची माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशाने कुलसचिवांनी बदल्यांचे आदेश जारी केले. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांची बदली लेखा विभाग, परीक्षेतील डॉ.गणेश मंझा शैक्षणिक विभागात, विशेष कक्षाचे व्ही.आर. मोरे परीक्षा विभागात, वरिष्ठ सहायक एस.बी. साठे लेखा विभागातून परीक्षा विभागात, एस.व्ही. चित्रक आस्थापनेतून परीक्षा विभागात, डॉ.डी.एच. वाल्हेकर हे परीक्षेतून आस्थापनेत, एन.आर.कडू परीक्षेतून विद्यार्थी कल्याण, सामान्य प्रशासनाचे आर.एस. जावळे विद्यार्थी कल्याण, दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्रातील भाषा प्रयोगशाळा सहायक ए.पी.दहिभाते यांची युनिक आणि आस्थापनेतील शिपाई आर.बी. मुंगसे यांची अतिथीगृह येथे बदली करण्यात आली आहे.

तीन विभागप्रमुख बदलले

गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे संचालक डॉ.भगवान साखळे यांच्या जागी समाजशास्त्र विभागातील डॉ.संजय साळुंके, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.संजय साळुंके यांच्याऐवजी प्रा.पी.एम. शहापूरकर आणि क्रीडा विभागाच्या प्रभारी संचालकपदी प्रा.संदीप जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. त्यातील प्रा.शहापूरकर आणि प्रा.जगताप यांनी पदभार स्वीकारला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद