सध्या वाळूचे दर वाढलेले असून याचा फायदा उचलण्यासाठी वाळू माफियांनी कंबर कसली आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे नद्यांमध्ये चांगली वाळू जमा झालेली आहे. कोणतीही रॉयल्टी न भरता वाळू माफिया रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत असून बक्कळ नफा कमवीत आहेत. महसूल व पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या वाळू माफियांचे चांगलेच फावत आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी जोरात वाहने चालवीत असल्याने गावकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आमठाणा परिसरात अवैध वाळूची वाहतूक
By | Published: December 02, 2020 4:11 AM