लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात हजारो टन कच-याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा सगळा कचरा उचलून टाकण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे पालिकेची १५६ दिवसांपासून दमछाक सुरू आहे. सर्व स्तरातून टीका होत असल्याने प्रशासन कचरा उचलण्याचे काम वेगाने करीत आहे; परंतु जिथे कचरा टाकण्याचा प्रयत्न होतो, तेथे नागरिकांच्या विरोधाला पालिकेला सामोरे जावे लागत आहे.मंगळवारी पहाटेपासून ६० ट्रक कचरा उचलून चिकलठाणा व पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रात टाकण्यात आला; मात्र पडेगाव येथे नागरिकांनी कचºयाच्या वाहनांना येण्यास विरोध करीत दगडफेक केली. त्या दगडफेकीत एका ट्रकच्या काचा फुटून नुकसान झाले.
कचऱ्याची वाहने अडविली; संतप्त जमावाकडून दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:34 AM