लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भावसिंगपुरा आणि पडेगाव परिसरात कचरा टाकण्यास आज दुसºया दिवशीही नागरिकांनी विरोध करून ठिय्या आंदोलन केले. मनपाने कचरा भरून नेलेली १५ वाहने सकाळी पोलीस बंदोबस्तात पडेगावात दाखल होताच नागरिकांनी आंदोलन करून विरोध केला. दोन तास आंदोलन केल्यानंतर अखेर मनपा अधिकाºयांनी येथून पुढे कचरा घेऊन येणार नसल्याची शाश्वती दिल्यावर नागरिकांनी बुधवारी कचरा भरून नेलेली १५ वाहने रिकामी करण्यास मुभा दिली.नारेगाव-मांडकी येथील जुना कचरा डेपो बंद झाल्यामुळे संपूर्ण शहरात १५७ दिवसांपासून कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा डेपो बंद पडल्यानंतर पालिकेची सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल आणि पडेगाव येथील चार जागा शोधल्या. तेथे कचरा टाकला जात आहे; परंतु तेथे टाकण्यात येणाºया कचºयावर कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने स्थानिक नागरिकांकडूनकचरा टाकण्यास विरोध होत आहे.मनपाने मंगळवारी पडेगाव येथील कत्तलखाना परिसरात कचºयाची ५० वाहने रिकामी केली. यादरम्यान काही नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करून कचºयाच्या वाहनांवर दगडफेक केली होती. त्यात एका ट्रकच्या काचा फुटल्या. त्यानंतर तेथे पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आला. खंडेराव लोखंडे, बाळासाहेब शेलार, सुनील लोखंडे, अंकुश लोखंडे, दिलीप कवडे यांच्यासह भावसिंगपुरा, पडेगावआणि ग्लोरिया सिटी येथील नागरिकांचा आंदोलनात सहभाग होता.मनपाची वाहने बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पडेगाव भागात गेल्यानंतर भावसिंगपुरा, पडेगाव येथील नागरिकांनी कत्तलखाना रोडवरच ती वाहने रोखली. संतप्त नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. शहर अभियंता एस. डी. पानझडे, सहा.आयुक्त नंदकुमार भोंबे यांची नागरिकांची समजूत काढण्यात दमछाक झाली. परंतु नागरिकांनी वाहने रोखून धरली. नागरिकांना समजून सांगण्यात शहर अभियंत्यांचा घसा बसला. यापुढे नव्याने कच-याची वाहने आणणार नाहीत. आज आलेल्या वाहनांतील कचरा टाकू द्या, असा प्रस्ताव अधिका-यांनी मांडला. त्यानंतर आंदोलकांनी ही १५ वाहने रिक्त करण्यास परवानगी देऊन आंदोलन मागे घेतले.
पडेगावात कचऱ्याची वाहने दोन तास रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:36 AM