औरंगाबाद : कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढली आणि अखेर एसटीचा प्रवास करण्यास ब्रेक देण्यात आला. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर अखेर जवळच्या जिल्ह्यात एसटीचा प्रवास सुरू करण्यात आला. त्यात सॅनिटायझर आणि मास्कचा वापर सर्रास केला जात आहे. कारण कोरोनामुळे खबरदारीची उपाययोजना प्रवासी स्वत:देखील घेत आहेत.
जिल्ह्यात एकूण ५५० बसेस असून, १२१३ चालक आहेत. वाहक संख्या ९३१ असून, एकूण कर्मचारी संख्या २९०० आहे. सध्या कोरोनाचा फटका बसत असल्याने २५६ चालक आणि १७७ वाहक कार्यरत आहेत. एकूण ५५३ कर्मचारी आहेत, अशी अवस्था मध्यवर्ती बसस्थानकाची आहे. एकूण दीड महिन्यात २३ कोटीच्या जवळपास नुकसान झाले आहे. सध्या जवळच्या जिल्ह्यात एसटी सेवा सुरू झालेली आहे. तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. एसटीचे तिकीट काढून जेमतेम प्रवासीच जाताना दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला सुरक्षिततेसाठी सॅनिटायझरचा वापर करण्यावरदेखील भर दिलेला आहे. एसटीमध्ये प्रवाशांना मास्क लावल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.
जालना मार्गावरच अधिक बससेवा चालताना दिसत आहे. सध्या खरीप हंगाम जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी हे गावाला जाताना दिसत आहेत. कोरोनामुळे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाईन प्रवासास परवानगीशिवाय जाता येत नव्हते. जिल्हा बंदी करण्यात आली होती. परंतु दीड महिन्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झालेली आहे.
बस सुरू झाली अन् जिवात जीव आला...
- कोरोना काळात अनेक चालकांना बाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कामावर येणे बंद झाले होते. ते बरे झाल्याने पुन्हा प्रवाशांची ने-आण सुरू केली आहे.
- चालक, एसटी
- वाहकांची कोरोनामुळे अवस्था वाईट बनलेली होती. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे एसटीतील जेमतेम वाहकांनाही ठरल्याप्रमाणे घरीच थांबावे लागले. अखेर दीड महिन्यानंतर एसटी सुरू झाल्याने कुटुंबांच्या जिवात जीव आला आहे.
- वाहक, एसटी
मास्कशिवाय प्रवेश नाही...
एसटीत प्रवास करण्यासाठी प्रवासी स्वत:हूनच मास्क लावून येतात, कारण मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. सॅनिटायझरचा देखील उपयोग केला जातो.
अनेक प्रवासी घरातच...
लॉकडाऊनचे अनलॉक केल्याची घोषणा झाली आणि पुन्हा जैसे थे असल्याचे समजल्याने अनेक प्रवासी घरातच बसून आहेत. कोरोना संक्रमणात आपण जायला नको, असाही निर्णय घेतला आहे.
२३ कोटींचे नुकसान..
एसटीला दीड महिन्याच्या काळात एकूण २३ कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. कारण प्रवासी संख्याच रोडावली आणि एसटीचा प्रवास बंद केल्याचा परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात एकूण बसेस : ५५०
एकूण चालक : १२१३
सध्या चालक : २५६
एकूण वाहक - ९३१
सध्या वाहक - १७७
एकूण कर्मचारी - ६२२२
सध्या कर्मचारी - ५५३
(डमी स्टार ७७५ )