न्युरोएन्डोक्राइन ट्युमर हा कर्करोग असून, तो न्युरोएन्डोक्राइन सेल नावाच्या विशेष पेशींमध्ये सुरू होताे. हा ट्युमर दुर्मीळ असून शरीरात कुठेही होऊ शकतो. बहुतेक न्युरोएन्डोक्राइन ट्युमर फुप्फुस, लहान आतडे, गुदाशय आणि स्वादुपिंडात आढळतात. या उपचारासाठी पूर्वी मुंबई, दिल्ली, हैदराबादसारख्या मेट्रो सिटीमध्ये जावे लागत असे; परंतु आता ही उपचारपद्धती औरंगाबादेत सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय टळली आहे. कॅन्सर तज्ज्ञ डॉ. तुषार मुळे व न्यूक्लिअर मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी एका रुग्णावर ही उपचारपद्धती यशस्वीरीत्या केली आहे. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. मनीषा टाकळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे यांनी मार्गदर्शन केले.
युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये न्युरोएन्डोक्राइन ट्युमरवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:04 AM