औरंगाबाद : चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवजात शिशू दक्षता विभागाचे (एनबीएसयू)उद्घाटन झाले. यामध्ये यापुढे जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूंवर उपचार होणार आहेत.
जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. महेश लड्डा,डॉ. संतोष नाईकवाडे, डॉ. भारती नागरे आदींच्या उपस्थितीत या विभागाचे उद््घाटन करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून एक- एक विभाग कार्यान्वित केला जात आहे. डिसेंबर महिन्यांत प्रसूती विभाग सुरु झाला. याठिकाणी गरोदरमातांचा ओघ वाढत आहे.
प्रसूतीनंतर अनेक बालकांमध्ये गुंतागुंत आणि विविध आजारांची समस्या उद्भवते. अशावेळी नवजात शिशू विभाग महत्वपूर्ण ठरतो. जिल्हा रुग्णालयात अखेर नव्या वर्षात हा विभाग सुरु करण्यात आला. घाटी रुग्णालयात बालरोग विभाग, नवजात शिशू विभागात बालकांच्या उपचारांच्या मोठा भार आहे. जिल्हा रुग्णालयात सुरु केलेल्या विभागामुळे घाटी रुग्णावरील नवजात शिशुच्या उपचाराचा किमान काही भार कमी होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विभागात वाढ होईलनवजात दक्षता विभागात सध्या ४ बेडची सुविधा आहे. कावीळ झालेले नवाजत बालके, कमी वजन असलेल्या बालकांवर याठिकाणी उपचार होतील. या विभागाच्या सुविधेत नतंर आणखी वाढ होईल.-डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक