पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, इको बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पी. व्यंकटेश, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, मुख्य वन संरक्षक एस. एम. गुजर, आदींसह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, शासनाकडून सातत्याने वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यात येते. शासनामार्फतही विविध पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम राबविले जातात. ‘गोगाबाबा टेकडी हरितकरण’ हादेखील त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. जीवन आनंदी, निरोगी व निरामय जगण्यासाठी वृक्ष आपल्या जीवनात मोलाचे कार्य करतात. कोविड – १९ मध्ये ऑक्सिजनचे महत्त्व आपणास कळलेले आहे. मात्र, आता सुदृढ जीवन जगण्याची आशा करणाऱ्या माणसांसाठी गोगाबाबा टेकडी हरितकरण कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सपत्नीक वृक्षारोपण करून ‘गोगाबाबा टेकडी हरितकरण’चा प्रारंभ केला. उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी प्रास्ताविक करून आभारही मानले.
फोटो ओळ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी परिसरात वृक्षारोपण करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.