नांदेड : बसस्थानकाकडे वळण घेणार्या बसवर रस्त्यालगतचे निलगिरीचे झाड तुटून कोसळले़ तुटलेल्या झाड बसच्या टपावर अडकल्याने सुदैवाने एकही प्रवाशी जखमी झाला नाही़ ही घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ आंध्र प्रदेश परिवहन विभागाची बस क्रमांक एपी़ ३६ झेड़ ०२७५ शिर्डी-वरंगल सकाळी ११ वाजता शिर्डी येथून निघाली़ सदर बस मालेगाव मार्गे कलामंदीर परिसरातून नांदेड बसस्थानकाकडे जात होती़ दरम्यान शहरबस स्थानकासमोरुन वळण घेत असताना रस्त्यालगतचे निलगिरीचे झाड तुटले़ झाडाच्या फांद्या बसवरील लोखंडी करीअरवर अडकल्या़ त्यामुळे बसचे अंशत: नुकसान झाले़ अपघात घडला त्यावेळी बसमध्ये किमान ६० प्रवाशी होते़ सुदैवाने एकही प्रवाशी जखमी झाला नाही़ झाड कोसळले तेव्हा मोठा आवाज झाल्याचे बसमधील प्रवासी श्रीनिवासन यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले़ बसस्थानकात प्रवेश करणार्या मुख्य मार्गावर अपघात झाला़ त्यामुळे बसस्थानकात येणार्या-जाणार्या वाहनांना शहरबसस्थानकातून वळण देण्यात आले़ माहिती मिळताच वजिराबाद ठाण्याचे पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले़ तुटलेल्या झाडाच्या फांद्या कटरने तोडून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली़ यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़ (प्रतिनिधी)
बसच्या टपावर झाड कोसळले
By admin | Published: May 20, 2014 1:43 AM