-मुजीब देवणीकर
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या २०१४ सारखा राजकीय ‘ट्रँगल’ आकार घेतोय. येथील राजकीय कुरुक्षेत्रात शिंदेसेनेकडून सर्वप्रथम प्रदीप जैस्वाल यांचे नाव जाहीर झाले. उद्धवसेनेकडून किशनचंद तनवाणी, तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. २०१९ प्रमाणे यंदाही वंचित बहुजन आघाडी फॅक्टरही आहे. त्यामुळे येथील राजकीय लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमसारख्या नवख्या पक्षाने विधानसभा निवडणूक लढविली. याच मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले. राजकारणातील दिग्गज मंडळींना हा निकाल बुचकळ्यात टाकणारा होता. मत विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला होता. तब्बल १० वर्षांनंतर या मतदारसंघात पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले. आता शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल मैदानात आहेत. उद्धवसेनेकडून पुन्हा किशनचंद तनवाणी, तसेच एमआयएमकडून इम्तियाज जलील नशीब आजमावतील. अजून दोघांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. वंचित बहुजन आघाडीने अगोदरच जावेद कुरैशी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
२०१४ आणि २०१९ मधील मतांची टक्केवारीमध्य मतदारसंघात ३ लाख ६६ हजार ४३५ मतदार आहेत. हिंदू मतदान जवळपास ४५%, मुस्लीम मतदार ३८%, दलित समाजाचे १५.०%, इतर ३ % मतदान असल्याचा अंदाज आहे. २०१४ मध्ये इम्तियाज जलील ३२ % मतदान घेऊन निवडून आले. प्रदीप जैस्वाल २२.२,% किशनचंद तनवाणी यांनी २१.६ % मते घेतली. २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे प्रदीप जैस्वाल यांना ४२ %, एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांना ३५ % मते पडली. वंचितचे अमित भुईगळ यांनी १४ % मते घेऊन आपला प्रभाव दाखवून दिला होता.
२०१४ मध्ये कोणाला किती मतेपक्ष-------उमेदवार-- -मिळालेली मते- -- --टक्केवारीएमआयएम- इम्तियाज जलील----६१,८४३-------३२.८शिवसेना---प्रदीप जैस्वाल----४१,८६१--------२२.२भाजप--किशनचंद तनवाणी-----४०,७७०----२१.६राष्ट्रवादी काँग्रेस- विनोद पाटील---११,८४२-----०६.३बहुजन समाज पार्टी-संजय जगताप---११,०४८----५.९मनसे---- राज वानखेडे-----६.२९१------३.३काँग्रेस----एम. एम. शेख-----९,०९३-----४.८
२०१९ मध्ये कोणाला किती मतेपक्ष---उमेदवार-----मिळालेली मते- -टक्केवारीशिवसेना- प्रदीप जैस्वाल----८२,२१७-----४२.६एमआयएम- नासेर सिद्दीकी-----६८,३२५----३५.४वंचित - अमित भुईगळ-------२७,३०२-----१४.१राष्ट्रवादी काँग्रेस- कदीर मौलाना----७,२९०----३.८