शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोपर्डी दुर्घटनेतील भगिनीस सकल मराठा समाजातर्फे श्रद्धांजली

By बापू सोळुंके | Published: July 13, 2023 2:42 PM

कोपर्डी येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर चार नाराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेला आज सात वर्षे पूर्ण झाले

छत्रपती संभाजीनगर : 13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने सुनावलेल्या फाशीची शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी. हीच, त्या पिडितेला श्रद्धांजली ठरेल आणि तिला न्याय मिळेल अशी भावना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने टीव्ही सेंटर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.

कोपर्डी येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर चार नाराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेला आज सात वर्षे पूर्ण झाले .या घटनेनंतर एकवटलेला मराठा समाजाचे मराठा क्रांती मोर्चा मध्ये रूपांतर झाले कोपर्डीच्या भगिनींना न्याय द्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आणि अन्य मागण्यासाठी राज्यात 58 मोर्चे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आले . या मोर्चाची पहिली सुरुवातही छत्रपती संभाजी नगर मधून झाली होती. आज सकल मराठा समाजाच्यावतीने टीव्ही सेंटर येथे आयोजित श्रद्धांजली सभेमध्ये त्या पिडीतेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाकडे दिले असून सुद्धा सात वर्षात या भगिनीला न्याय मिळालेला नाही . महिला अत्याचार थांबलेले नाहीत . राज्य सरकारने तात्काळ या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी .या भगिनीस जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली तिला ठरणार नाही, असा सूर यावेळी उपस्थितांमध्ये उमटला. यावेळी सुरेश वाकडे ,सतीश वेताळ, मनोज गायके ,सुनील सोळंके सर, प्रदीप हारदे, गणपत मस्के, अजय गंडे ,योगेश औताडे, सुकन्या भोसले, रेखा वहाटुळे,तनश्री गायकवाड,अनिल तुपे,योगेश देशमुख, रतन काळे, शिवाजी भिंगारे ,संदीप जाधव,विवेक कानड़खेडकर, आप्पासाहेब औताडे, प्रकाश बनकर,विलास औताडे ,शिवाजी पळसकर,संजय जाधव ,रविऔताडे, भगवान देवकर,सचिन शिंदे,संतोष काकडे,अक्षय लोंढे,गिरीश झाल्टे,रामदास गायकवाड़, विनोद शिरोळे आदी उपस्थित होते..