मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पेंडापूर फाट्याजवळील ढोरेगाव शिवारातील ढाब्यावर बाॅयोडिझेलची विनापरवाना अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी येथे धाड टाकली असता, आरोपी विनय गोकुळ ढाके, शेख अहमद शेख बशीर (रा. औरंगाबाद) व मिलिंद पृथ्वीराज मोखाडे हे टँकर (क्र. एमएच १९ झेड १०५९)मधून पाइपच्या मदतीने डिझेल बाहेर काढून त्याचा अवैध साठा करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी २ हजार लिटर क्षमतेने भरलेल्या डिझेल टँकरसह बांगडी पाइप व मोटर असा एकूण ११ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तिन्ही आरोपी व ढाबामालक गुलाब हुसैन पटेल (रा. नंद्राबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार अविनाश अंकुश व पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली. पुढील तपास पोनि. संजय लोहकरे हे करीत आहेत.
फोटो : टँकरमधून अशा पद्धतीने डिझेल काढून विकले जात होते.
140721\1748-img-20210714-wa0060.jpg
गंगापूर - विनापरवाना डिझेल विक्रीचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले