------
जिल्ह्यातील क्षयरोगी - ९०१
भत्ता किती जणांना मिळतो - ६०२
आहार भत्ता न मिळणाऱ्यांचे प्रमाण - ३४ टक्के
--------
टीबीची लक्षणे काय ?
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, छातीत दुखणे, भूक न लागणे, बेडक्यावाटे रक्त पडणे, रात्रीचा येणारा ताप ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्रात संशयित क्षयरुग्णांची एक्सरे तपासणी, थुंकी नमुना तपासणी आणि सीबीनॅट तपासणी सुविधा मोफत उपलब्ध आहे.
-------
जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त
- उपचाराला दाद देणारा टीबी आणि उपचाराला दाद न देणारा टीबी, यावरून क्षयरोगाच्या उपचाराचा कालावधी ठरलेला आहे. उपचाराला दाद देणाऱ्या टीबीचा रुग्ण ६ महिन्यांत बरा होताे.
- तर ९ ते ११, १८ ते २० आणि २४ ते २८ महिने उपचार घेऊनही टीबीमुक्त होता येते. त्यामुळे जास्तीत जास्त २८ महिन्यांत रुग्णाला टीबीमुक्त आयुष्य जगता येऊ शकते.
-
औरंगाबादेत सर्वाधिक प्रमाण
नमूद कोणतेही एक लक्षण आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेत क्षयरोगाची तपासणी करून घेतली पाहिजे. टीबी हा उपचारांनी बरा होणारा आजार आहे. त्यामुळे आजाराला घाबरून जाऊ नये. पोषण योजनेचा भत्ता अदा करण्याचे प्रमाण औरंगाबादेत ६६ टक्के आहे. राज्याचे हे प्रमाण ४८ टक्के आहे.
- डाॅ. उल्हास गंडाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी