हिंगोली : मागील काही दिवसांपासून तुरीची आवक मंदावली असली तरी भावातही मोठी घसरण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बुधवारी हा भाव ८३५५ रुपयांपर्यंत आला होता.काही दिवसांपूर्वी तुरीचे दर दहा हजारांवर गेले होते. त्यानंतर हळूहळू भावामध्ये घसरण होत गेली. २६ डिसेंबरला ९२१0 रुपयांचा भाव मिळाला होता. त्यानंतर ४ जानेवारीला तुरीचा भाव ९७३0 रुपयांवर गेला होता. तेव्हापासून कायम चढउतार सुरू आहे. २२ जानेवारीपासून ९ हजारांच्या खाली उतरलेली तूर पुन्हा त्यापुढे गेली नाही. बुधवारी तुरीला कमला भाव ८३५५ रुपये एवढा मिळला आहे. मागील सात-आठ दिवसांत हरभऱ्याच्या भावात मात्र तेजी पहायला मिळत आहे. ४३00 रुपयांवरून ४५५५ रुपयांपर्यंत भाव गेले आहेत. सोयाबीनला मध्यंतरीचा एक-दोन दिवस वगळला तर ३७00 ते ३८00 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.