ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 1 - सिल्लोड तालुक्यात गेल्या 4 महिन्यात 80 टँकर ने 86 गावात पाणी पुरवठा होत होता. यावर शासनाने जवळपास 2 कोटी 50 लाख रूपये खर्च केले आहे. 1 जुलै पासून टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र मुबलक पाऊस न पडल्याने 15 गावात अजूनही पाणी टंचाई आहे. यामुळे त्या गावात टँकर सुरु ठेवावे अशी मागणी ग्राम पंचायतिने केली आहे. तालुक्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाई मुळे शासनाचे अडीच कोटी रूपये पाण्यात गेले आहे.
मार्च ते जून या चार महिन्यात सिल्लोड तालुक्यात टँकर ने पाणी पुरवठा केला जातो. दर वर्षी 1 जुलै पासून टैंकर बंद होतात. तसे या वर्षी सुद्धा 1 जुलै पासून टैंकर बंद करण्यात आले आहे. मात्र तालुक्यात अजुन एकही मोठा पाऊस झाला नाही. यामुळे नदी नाले विहीरी भरल्या नाही... पिकाना थोडा दिलासा देणारा पाऊस पडला आहे. यामुळे सिल्लोड तालुक्यातील 15 गावात अजूनही पाणी टंचाई आहे. यामुळे त्या 15 गावातील टँकर बंद करू नये अशी मागणी त्या त्या गावातील ग्राम पंचायत ने पंचायत समीती कड़े केली आहे. मात्र शासकीय यंत्रणेने तालुक्यातील सर्व टँकर बंद केले आहे.
या पंधरा गावात टँकर ची मागणी..
खातखेडाखुर्द, बुद्रुक, वांगी बुद्रुक, पिंपळदरीवाडा, मुखपाठ, बोजगाव, धावडा, चिंचवन, बोरगांव सारवनी, जलकीघाट, सराटी, पिंपळदरी, पिंपळगाव, वड़ोदचाथा, के-हालातांडा , यागावात अजूनही टैंकर ने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.
या गावातही पाणी टंचाई
सिल्लोड तालुक्यातील कोटनांन्द्रा, नाटवी, गव्हाली, पिरोला डोइफोड़ा, उंडंणगावच्या 2 वाड्या, निल्लोडवाड्या, शिरसालातांडा, चिंचखेडा या 9 गावातही पाणी टंचाई आहे. मात्र या गावांची टैंकर सुरु करण्याची मागणी अजुन शासन दरबारी आली नाही.
जूनअखेर 24 गावात 29 टँकर सुरु होते
चार महिन्यात 80 टँकर ने पाणी पुरवठा करन्यात आला तर ..जून मध्ये झालेल्या पावसामुळे संख्या घटली होती.केवळ 24 गावात 29 टैंकर सुरु होते. पण अचानक 1 जुलै पासून सर्व टैंकर बंद झाल्याने नागरिकांची धावपळ होत आहे.
पाहणी करुण टँकर अहवाल पाठविणार
1 जुलैला नियमानुसार टँकर बंद केले जातात. त्यामुळे... अजूनही कुन्या गावात टैंकरची गरज असेल तर त्यानी मागणी करावी.स्थळ पाहनी करुण जिल्हाधिकारी यांच्याकड़े अहवाल (प्रस्ताव) पाठविन्यात येईल.गरज असेल त्या गावात पुन्हा टैंकर सुरु करण्यात येईल.
-संतोष गोरड तहसीलदार सिल्लोड.
सिल्लोड तालुक्यात झालेला पाऊस...
सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, भराड़ी, अंभई, अजिंठा, आमठाना, गोळेगाव, निल्लोड, बोरगांवबाजार याआठ मंडळात 1 जूनते 30 जून पर्यन्त 183.43 मिली मिटर पाऊस झाला आहे. मात्र सर्वत्र नदी नाले , विहीरी ची पाणी पातळी वाढली नाही. ठिबक सारख्या पडलेल्या पावसामुळे कसे तरी कोवळी पीके तग धरून उभी दिसत आहे.