शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

वॉर्ड सभापतींसाठी रस्सीखेच; आज मतदान, तीन प्रभागांत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:43 AM

महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग समितींच्या सभापतीपदी बन्सी जाधव, रमेश जायभाये आणि सुमित्रा हळनोर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग समितींच्या सभापतीपदी बन्सी जाधव, रमेश जायभाये आणि सुमित्रा हळनोर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. सहा प्रभागांमध्ये सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, सभापती निवडण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता मतदान घेण्यात येणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम काम पाहणार आहेत.नवीन सभापती निवडण्यासाठी सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग क्रमांक-४ हर्सूलच्या सभापतीपदासाठी बन्सी जाधव, प्रभाग-७ मालखरे अपार्टमेंट येथील सभापतीपदासाठी रमेश जायभाये आणि प्रभाग क्रमांक-९ क्रांतीचौक येथील सभापतीपदासाठी सुमित्रा हळनोर यांचा एकच अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे, तर प्रभाग क्रमांक-१ टाऊन हॉल येथे आशा निकाळजे, खान नसरीन बेगम आणि परवीन कैसर खान यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग-२ मोंढा येथे बबिता चावरिया आणि रेशमा कुरेशी या दोघांनी अर्ज भरले.प्रभाग-३ सेंट्रल नाका येथे सय्यद सरवत बेगम आणि पठाण अस्मा फिरदोस, प्रभाग-५ सिडको येथे सुरेखा खरात आणि भारती सोनवणे, प्रभाग-६ सिडको येथे मनोज गांगवे आणि सोहेल शेख, प्रभाग-८ सातारा येथे अप्पासाहेब हिवाळे आणि सायली जमादार यांचे अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष सभेत मतदानाद्वारे या प्रभाग समिती सभापतींची निवड होणार आहे.सेना-भाजप युतीने प्रभाग समिती सभापतीपदांबाबतही करार केला आहे. ९ प्रभागांपैकी ७ प्रभागांमध्ये युतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यातील ३ पदे सेनेकडे, तर ४ पदे भाजपकडे राहणार आहेत. एका प्रभागात एमआयएम नगरसेवकांची संख्या अधिक आहे, तर राहिलेल्या एका प्रभागात एमआयएम आणि सेनेचे संख्याबळ आहे. येथे एका अपक्षाला सेनेने पाठिंबा दिलाआहे.

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादElectionनिवडणूकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर राम