औरंगाबाद : औरंगाबाद इन्स्टिट्यूट आॅफ क्रिकेट (ए.आय.ओ.सी.)तर्फे १ ते १८ फेब्रुवारीदरम्यान निमंत्रित संघांची टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. त्यात दिल्ली, अहमदाबाद, जम्मू-कश्मीर, झारखंड, गोवा, हैदराबाद या संघांसह मराठवाड्यातील संघ सहभागी होणार आहे. विजेत्या संघास अडीच लाख रुपये रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. उपविजेत्या संघास दीड लाख रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मालिकावीर, सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात अली आहेत. ही स्पर्धा गरवारे आणि एडीसीएच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे.स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी कसाटीपटू सलीम दुर्राणी आणि इक्बाल सिद्दीकी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेस आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल पांडे, माजी रणजीपटू व ए.आय.ओ.सी.चे अध्यक्ष मुझफ्फर हसन, तन्वीर हुसैन, आयोजन समितीचे चेअरमन सरताज खान, विभाकर खांदेवाले, अनीस उर रेहमान खान, संजय व्यापारी, डॉ. शाहेद शेख, सय्यद नवीद अक्रम, उदय पांडे आदींची उपस्थिती होती.
१ फेब्रुवारीपासून टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:24 AM