बीड : एकाच विहिरीचे दोनदा बिल उचलून हजारोंचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे. तथापि, गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करुन सीईओंना दिलेला अहवाल संदिग्ध असल्याने कारवाई रखडली आहे.पांढरी येथे मग्रारोहयोतून बुडीत क्षेत्रात जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. २०१३ मध्ये धनादेशाद्वारे आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून मस्टरद्वारे अकुशल कामाचे देयक मजुरांना वाटप केले होते. त्यानंतर हीच विहीर पोखरी (ता. आष्टी) येथील दाखवून बोगस मजुरांच्या नावे आॅनलाईन ४३ हजार ५७८ रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हरिनारायण आष्टा येथील शाखेतून उचलले. यासंदर्भात गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी चार अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशी केली. त्याचा अहवाल सीईओंना दिला. मात्र, त्यात केवळ पोखरीतील ग्रामरोजगार सेवक मनोहर आंधळेंवर ठपका आहे. (प्रतिनिधी)विहीर पांढरीची मग पोखरीचा ग्रामरोजगार सेवक दोषी कसा?, त्या काळातील गटविकास अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, सहायक लेखाधिकारी, संगणक आॅपरेटर यांच्या नावांचा उल्लेख का नाही?, धनादेशाद्वारे उचललेल्या देयकाच्या पावत्या का जोडल्या नाही? असे प्रश्न सीईओंनी उपस्थित केले आहेत.
एकाच विहिरीचे दोनदा बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2016 11:58 PM