सूत्रांनी सांगितले की, सनी सेंटर येथील श्रेयल ज्वेलरी आणि बुटिक हे दुकान १३ जून रोजी रात्री फोडून चोरट्यांनी ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. या घटनेचा तपास सिडको पोलीस करीत असताना गुन्हे शाखेने संशयित आरोपी शेख उमर यास पकडले आणि त्याला सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार रईस खान याच्यासह हे दुकान फोडल्याचे सांगितले. या घटनेत चोरलेला ऐवज दाेघांनी वाटून घेतल्याचे कबूल केले. यानंतर लपवून ठेवलेला लॅपटॉप, एक ग्रॅम सोन्याचे दागिने, दुल्हन सेट आणि अन्य वस्तू असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हवाली केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राठोड, पोलीस नाईक संतोष मुदिराज आणि पोलीस काॅन्स्टेबल इरफान खान यांनी केली.
बुटिक फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:04 AM