अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे चोरट्यांनी एक दोन नव्हे तब्बल चार घरे फोडून लाखोचा ऐवज लंपास केला़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील मुख्य मार्गावर आप्पासाहेब श्रीनिवास पुजारी यांचे हॉटेल आहे़ पुजारी यांच्या हॉटेलचे कुलूप शनिवारी पहाटेच्या सुमारास तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ हॉटेमधील काऊंटरमध्ये ठेवलेले रोख २० हजार रूपये, मोबाईल, शीतपेयांसह इतर साहित्य लंपास केले़ त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रवी बाळू मोकाशे यांच्या घराकडे वळविला़ मोकाशे यांचे घर फोडून तीन तोळ्याचे दागिने, २० हजार रूपये रोख रक्कम लंपास केली़ तसेच चेतन प्रफुल्ल कस्तुरे यांचे किराणा दुकानही चोरट्यांनी फोडले़ या दुकानातील ४ हजार रूपये रोख, दुकानातील किराणा साहित्य असे जवळपास दहा ते पंधरा हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तर विठ्ठल शंकरराव पुजारी यांचे घर चोरट्यांनी फोडले़ मात्र, तेथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही़ शनिवारी सकाही ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली़ चोरट्यांनी एक हॉटेल, किराणा दुकान व दोन घरे फोडल्याचे समजताच गावासह परिसरात एकच खळबळ उडाली़ घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली़ या प्रकरणी आप्पासाहेब पुजारी यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना घारगे करीत आहेत़ (वार्ताहर)परंडा तालुक्यातील सोनारी येथे गुरूवारी रथयात्रा होती़ या रथयात्रेनिमित्त बार्शी (ता़सोलापूर) येथील सिध्देश्वर गोवर्धन जाधव हे भाविक आले होते़ सिध्देश्वर जाधव हे सोनारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आले असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रूपयांची सोन्याची गोफ (चैन) हातोहात लंपास केली़ या घटनेने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी सिध्देश्वर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास हवालदार मुळे हे करीत आहेत़
हॉटेल, दुकानासह दोन घरफोड्या
By admin | Published: May 08, 2016 11:21 PM