शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

अंबड-परळीच्या सेटिंगमुळे दोन उमेदवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:34 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी उच्चशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीसाठी ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंचने, तर राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलने उमेदवार मागे घेत बिनविरोध निवडून दिले. एकूण सहा उमेदवार बिनविरोध आले आहेत.विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक आणि विद्यापरिषदेच्या गटात उमेदवारी मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. संस्थाचालक गटात माजी उच्चशिक्षणमंत्री आमदार राजेश टोपे यांच्या पत्नी मनीषा टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलतर्फे नामांकन दाखल केले होते. त्यांच्याविरोधात ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंचतर्फे डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी नामांकन दाखल केले. डॉ. भारस्वाडकर यांनी नामांकन मागे घेण्यासाठी शेवटच्या क्षणी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या. शेवटच्या क्षणाला मनीषा टोपे बिनविरोध निवडून येत नसतील तर त्यांची उमेदवारीच मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र, राजेश टोपे यांनी थेट राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधत दोन्ही गटांचा एक-एक उमेदवार निवडून आणण्यावर एकमत केले. या एकमताला आमदार सतीश चव्हाण यांनी ऐनवेळी साथ दिल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक प्राचार्य डॉ. रामचंद्र इप्पर यांच्या विरोधातील बीडच्या बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव सानप यांनी प्राचार्यांच्या गटात एनटीमधून दाखल केलेले नामांकन मागे घेतले. तर मनीषा टोपे यांच्यासाठी डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे राजेश टोपे आणि पंकजा मुंडे यांच्या जवळचे दोन्ही उमेदवारांचा संबंधित गटात एकमेव अर्ज राहिल्यामुळे बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय उत्कर्ष पॅनलचे संस्थाचालक गटात राहुल म्हस्के, प्राचार्य गटात डॉ. शिवदास शिरसाठ, डॉ. तृप्ती देशमुख बिनविरोध आले. तर डॉ. रमेश मंझा हेसुद्धा बिनविरोध आले आहेत. मात्र, त्यांच्यावर उत्कर्ष आणि विद्यापीठ विकास मंचतर्फे दावा केला आहे. मात्र डॉ. मंझा यांनी आ. सतीश चव्हाण यांची भेट घेऊन उत्कर्ष पॅनलचा असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती डॉ. राजेश करपे यांनी दिली.