जरंडीपासून काही अंतरावर काटीखोरा नावाचा डोंगर असून, तिथे घनदाट जंगल आहे. डोंगराच्या कड्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने चरण्यासाठी आलेल्या दोन शेळ्यांवर झडप घालून त्यांना ठार केले. तर दोन्ही मृत शेळ्यांना त्याने फरफटत नेले. असे शेळीमालक महादू राठोड यांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर राठोड यांनी जरंडी गावात धाव घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला. वनपाल माया झिणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची गुरुवारी सकाळी पाहणी केली; मात्र पंचनाम्यासाठी शेळ्यांचा कोणताही भाग आढळून आला नाही. तर रात्री झालेल्या किरकोळ पावसाने पायाचे ठसेदेखील मिटून गेले होते. त्यामुळे वन विभागही रिकाम्या हाती परतले. या घटनेने जरंडी शिवारातील पशुपालक चिंतेत पडले आहेत.
290721\1948-img-20210729-wa0078.jpg
जरंडी ता सोयगाव शिवारात आढळले बिबट्याच्या पगमार्ग