विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाधिकारी (डीईओ/जिल्हा निवडणूक अधिकारी) व अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या (निर्णय अधिकारी) घेतलेल्या परीक्षेत दोन जिल्हाधिकारी व एक अपर जिल्हाधिकारी नापास, तर सहा अधिकारी काठावर पास झाले आहेत.
पाच बॅचमध्ये झाले होते प्रशिक्षण२८ आयएएस अधिकारी आणि २० अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर दि. ५ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत पाच बॅचमध्ये घेण्यात आले. त्या प्रमाणीकरण शिबिराचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
किती गुणांची परीक्षा?n५० गुणांची होती परीक्षा n३८ गुण मिळणे अपेक्षित होते. n३८ ते ४० दरम्यान गुण ०६ अधिकाऱ्यांना n४० ते ४५ दरम्यान गुण २३ अधिकाऱ्यांना n४५ ते ५० दरम्यान गुण १६ अधिकाऱ्यांना
सांगली ३९पुणे ४४सोलापूर ४७कोल्हापूर ४४पुणे ४९पुणे ५०धाराशिव ४१अहमदनगर ४८ठाणे ४५जळगाव ४६नाशिक ४६ठाणे ४५मुंबई शहर ४७मुंबई उपनगर ४०ठाणे ४६नागपूर ४३मुंबई शहर ४३मुंबई उपनगर ४६मुंबई उपनगर ४५मुंबई उपनगर ३७