लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : शहरातील व्यापाºयाला दहा लाखांची खंडणी मागणाºया दोन तरुणांना पैठण पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी पैठण शहरातील लक्ष्मीनगरातील रहिवासी असून यातील मुख्य आरोपी हा व्यापारी गोधा यांच्या नातेवाईकाच्या पेट्रोलपंपावर काही महिन्यांपूर्वी काम करीत होता. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात आरोपींना गजाआड केले.शहरातील व्यापारी बबनलाल शामलाल गोधा यांना ११ जून रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर १० लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी लगेच सायबर क्राईमच्या माध्यमातून आरोपींचा शोध लावला व आरोपी किरण विष्णू खरात (२०) व नंदू शांतीलाल कुंडारे (२१) या दोघांना गजाआड केले. पोलिसांनी आरोपीची कसून तपासणी केली असता आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम वारे,पो.कॉ. राजू बर्डे, राहुल बचाटे, गणेश शर्मा, जानकीराम शेलार हे करीत आहेत.मोबाईल सीमकार्ड मुंबईचेआरोपीने ज्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी फोन केला होता ते सीमकार्ड मुंबई येथील आहे. आरोपी किरण खरातचा एक मित्र मुंबई येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून कामास होता, तो सध्या पैठण येथे आला असून त्याच्याकडून दोन दिवस वापरण्यासाठी किरणने सीम कार्ड घेतले होते. या सीमकार्डचा वापर किरणने व्यापाºयास धमकी देण्यासाठी केल्याचे उघड झाले.आरोपी परिचितच्आरोपी किरण हा व्यापारी बबनलाल गोधा यांचे शालक व पैठणचे प्रतिष्ठित व्यापारी संजय पापडीवाल यांच्या पेट्रोल पंपावर काही दिवसांपूर्वी काम करत होता. यामुळे गोधा यांची सर्व माहिती आरोपीला होती.च्किरण सध्या एका खाजगी कंपनीत रोजंदारी कामगार म्हणून काम करतो. पुन्हा पेट्रोल पंपावर कामास घ्या म्हणून त्याच्या मामाने संजय पापडीवाल यांना भेटून विनंती केली होती. यानुसार पापडीवाल यांनी त्यास पुन्हा शुक्रवारपासून कामास या, असा निरोपही दिला होता, परंतु आज तोच खंडणीखोर असल्याचे समोर आले. दोन दिवसात पोलिसांनी आरोपी गजाआड केल्याने व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष नंदलाल लाहोटी यांनी पोलीसांचे आभार मानले आहे.
व्यापाऱ्याला खंडणी मागणारे दोघे जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:16 AM