शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

नायब तहसीलदाराकडून खंडणी उकळणारे दोन जण गुन्हे शाखेच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 6:51 PM

खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले.

ठळक मुद्देनायब तहसीलदारांना देत होते धमक्या मंत्रालय व जिल्हाधिकारी कार्यालयात केल्या होत्या तक्रारी

औरंगाबाद :  तलाठीपदी कार्यरत असताना अनियमितता केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करून परभणी येथे कार्यरत नायब तहसीलदाराला धमकावत ५० हजार रुपये खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. आरोपींपैकी एक जण आॅल इंडिया बंजारा टायगर्स संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

प्रेमदास तुकाराम चव्हाण आणि नंदू बाळा चव्हाण अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, हरिशचंद्र रंगनाथ सोनवणे (रा. आदित्यनगर, हर्सूल परिसर) हे सध्या परभणी येथे नायब तहसीलदार आहेत. २००४ ते २००८ या कालावधीत सोनवणे हे जटवाडा सज्जा येथे तलाठी होते. तेव्हा त्यांनी कार्यालयीन कामात उणिवा असल्याचे भासवून  आॅल इंडिया बंजारा टायगर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अशोक आर. राठोड यांच्याशी संगनमत करून जिल्हाध्यक्ष प्रेमदास चव्हाण आणि नंदू चव्हाण यांनी सोनवणेविरोधात  मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. याबाबतचे छायाचित्रे ते सोनवणे यांना पाठवून यापुढे तक्रारी न करण्यासाठी खंडणीची मागणी करीत होते. 

आरोपींकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला त्रस्त झालेले सोनवणे यांनी याविषयी गुन्हेशाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज पुन्हा आरोपींचा खंडणीसाठी फोन आला. याबाबतची माहिती सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी खंडणीखोरांना पकडण्यासाठी दोन पंचांसमक्ष सोनवणे यांच्या घरी सापळा रचला. त्याचवेळी आरोपींनी पुन्हा खंडणीसाठी फोन केला तेव्हा सोनवणे यांनी त्यांना पैसे घेण्यासाठी घरी बोलावले. 

३१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपी प्रेमदास तुकाराम चव्हाण आणि नंदू बाळा चव्हाण यांनी पंचांसमक्ष सोनवणे यांच्याकडून खंडणीचे पन्नास हजार रुपये घेतले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी प्रेमदास आणि नंदूला खंडणीच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि इतर वस्तू असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, कर्मचारी नंदकुमार भंडारे, विकास माताडे, नवाब शेख, विलास वाघ, वीरेश बने, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड यांनी केली. 

टॅग्स :ArrestअटकCorruptionभ्रष्टाचारAurangabadऔरंगाबाद