वाळूज महानगर : जोगेश्वीत घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना सोमवारी सांयकाळी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चोरी झालेले टीव्ही संच व घरगुती साहित्य व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
जोगेश्वरी येथील ताराबाई सिताराम गणराज यांच्या घरातून ५ एप्रिल रोजी चोरट्याने टीव्ही, रोख दोन हजार, प्लॉस्टिक ड्रम, लोसंडी डम्बेल्स आदी साहित्य लांबविले होते. याप्रकरणी ताराबाई गणराज यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचोरीतील चोरटे जोगेश्वरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अमोल विलास भिवसने (२२) व गणेश रतन चाटसे (३२) याला अटक केली. ताराबाई गणराज यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दोघांनी दिली. त्याच्याजवळून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.