लामणगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वीतील ६० विद्यार्थी दररोज शाळेत शिक्षणासाठी येतात. या शाळेचे मुख्याध्यापक मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बुधवारी शालेय व्यवस्थापन समितीने आठ दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तसेच खुलताबाद शहरातील कमला नेहरू शाळेतील एक शिक्षक मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शाळेला बुधवारपासून सुट्टी देण्यात आली आहे. या शिक्षकाच्या संपर्कातील १५ शिक्षक, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे सांगितले आहे. २५ फेब्रुवारी रोजी पिंपरी जि.प.शाळेतील एका शिक्षकाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता.
कोरोनाबाबत सतर्क
लामणगाव, पिंपरी, खुलताबाद येथील शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या शाळा दोन वेळेस सॅनिटाईज करण्यात येणार असून, त्यांच्या संपर्कातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना चाचणी करण्यास सांगितले आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ.
- सचिन सोळंकी, गटशिक्षणाधिकारी.