शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

दोन दिवसांत हजार अर्ज

By admin | Published: October 19, 2014 12:15 AM

लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे़ अर्जाची मुळ प्रत प्रत्येक तालुक्याच्या

लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे़ अर्जाची मुळ प्रत प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ३० आॅक्टोबरपर्यंत सादर करता येणार आहे. १७ व १८ आॅक्टोबर या दोन दिवसांमध्ये १ हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत.डीटीएड व बीएड विद्यार्थ्यांसाठी दुसरी परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षी १४ डिसेंबर रोजी जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांवर टीईटीची परीक्षा होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज सादर केले जात आहेत. १ ते २२ आॅक्टोबर दरम्यान आॅनलाईन अर्ज भरून त्याची मुळ प्रत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे देण्यात येत आहे. त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. दोन दिवसांत जवळपास १ हजार विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जांच्या मुळ प्रती दाखल केल्या आहेत. राज्य शासनाकडून वर्षभरात डीएड्. व बीएड.च्या विद्यार्थ्यांसाठी टीईटीची ही दुसरी परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांना शासनाने जाहिरात काढताच अर्ज भरण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावेळी जिल्हानिहाय परीक्षा केंद्र देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचीे सोय होणार आहे. शिवाय, आॅनलाईन अर्ज सादर केल्यावर त्याची मूळ प्रत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येत आहेत.लातूर जिल्ह्यात औसा, निलंगा, उदगीर, लातूर, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ व चाकूर येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्जांची मुळ प्रत स्वीकारली जात आहे. अर्जदारांनी आॅनलाईन अर्ज भरून त्याची मुळ प्रत शिक्षण विभागाकडे द्यावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.१३ ते १५ आॅक्टोबर निवडणुकीमुळे सुट्या असल्याने १६ आॅक्टोबर रोजी ६२५ अर्ज एकाच दिवशी जमा झाले होते़ १७ व १८ आॅक्टोबर या दोन दिवसात १००० अर्ज जमा करण्यात आले आहेत़ लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अर्ज महिला सक्षमीकरण विभागाच्या इमारतीत स्वीकारले जात आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन अर्ज दाखल करताना डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज चलनाद्वारे बँक शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये तर एससी, एसटी, अपंग यांच्यासाठी २५० रुपये आहे़ बीएडच्या विद्यार्थ्यांनाही हेच शुल्क आहे़ तर ज्यांना दोन्ही परीक्षा (डीएड, बीएड) द्यावयाच्या आहेत, त्यांच्यासाठी खुला गट ८०० रुपये तर एससी, एसटी, अपंग यांच्यासाठी ४०० रुपये भरावे लागणार आहे़ चलन भरण्याची अंतिम तारीख २७ आॅक्टोबर आहे़ दिवाळीत बँकांना सुट्या असल्याने विद्यार्थ्यांनी दिवाळीपूर्वीच अर्ज भरण्यासाठी घाई केली आहे. दोन दिवसांत शिक्षण विभागाकडे एक हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत.