नारायण कुरकुटे हे दुचाकीने जात असताना, त्यांच्या दुचाकीची धडक समोरून येणाऱ्या दुचाकी (एम.एच.२० इ.आर ०८४८) सोबत झाली. या अपघातात नारायण कुरकुटे यांचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या दुचाकीवरील कुणाल विजय त्रिभुवन (१५, रा. खंबाळा) आणि इतर १ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच लाडगाव येथील प्रमोद सोमवंशी, राजू जाधव, विकास पाटील, नितिन निंबाळकर, मगर, खेमनार, वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नारायण कुरकुटे यांना तपासून मृत घोषित केले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही अल्पवयीन मुले लाडगावच्या न्यू हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.
फोटो : नारायण कुरकुटे
240221\arjun telange_img-20210224-wa0017_1.jpg