निलेश लक्ष्मणसिंग ठाकूर (वय ३६, रा.पंढरपूर) शनिवारी मित्राची दुचाकी घेऊन कामानिमित्त वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात जात होता. पंढरपुरातील देवगिरी बँकेसमोर औरंगाबादहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने (सी.जी.०४, एम.एन.७५६८) दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीस्वार निशेल ठाकूर हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी निलेश यास त्याची आई शोभा ठाकूर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोना. सोनवणे हे करीत आहेत.
फोटो क्रमांक- निलेश ठाकूर (मयत)
---------------------------------
रांजणगावात महिलेस मारहाण
वाळूज महानगर : रांजणगावात ४० वर्षीय महिलेस मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देणाºया पती-पत्नीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिना किशोर चाबुकस्वार (४० रा.नर्सरी कॉलनी, रांजणगाव) या कंपनीत काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दोन दिवसांपुर्वी मिना वाघमारे यांच्या शेजारी राहणारे रामचंद्र शिंदे यांनी तीला तु माझ्याशी का बोलत नाही, असे सांगितले होते. यानंतर घाबरलेल्या मिना चाबुकस्वार यांनी मोनिका चाबुकस्वार हिला सोबत घेऊन शुक्रवारी सायंकाळी रामचंद्र पवार याच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी मिराबाई शिंदे यांच्याकडे पतीची तक्रार केली. यानंतर घराकडे परत जात असतांना रामचंद्र शिंदे व मिराबाई शिंदे यांनी मिना चाबुकस्वार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी मोनिका चाबुकस्वार यांनी मध्यस्थी करीत मिना चाबुकस्वार यांची सुटका केली. या प्रकरणी दोघा पती-पत्नीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------