वाळूज महानगर : बबन बापूराव सूर्यवंशी हे २३ नोव्हेंबरला दुचाकीने (एम.एच.२०, एफ.बी.६३८६) रांजणगावातील नातेवाईकांच्या घरी गेले होते. रात्रीच्यावेळी चोरट्याने ही दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------
पंढरपूरातुन इसम बेपत्ता
वाळूज महानगर : पंढरपूरच्या भाजी मंडईत बोरे विक्रीसाठी आलेला ४८ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सिध्देश्वर अर्जुन सुळे (रा.आष्टी जि.सोलापूर) हे २ डिसेंबरला पंढरपुरात बोरे विक्रीसाठी आले होते. भाजी मंडईतील व्यापाऱ्याकडून ५० रुपये घेऊन सिध्देश्वर सुळे हे बेपत्ता झाले आहे. सर्वत्र शोधशोध घेऊनही सुळे हे मिळून न आल्यामुळे त्यांचा मुलगा विकास सुळे याने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली.
---------------------------
उद्योनगरीत कंपनीसमोर सांडपाणी
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील यशश्री कंपनीसमोरील खड्ड्यात सांडपाणी साचल्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एखादे वाहन आल्यास रस्त्याने ये-जा करणाऱ्या कामगार व दुचाकीस्वारांच्या खड्ड्यांतील सांडपाणी उडत असल्यामुळे वादावादीच्या घटनाही वाढल्या आहेत.
-------------------
विवाहितेचा छळ करणाऱ्या ७ जणांविरुध्द गुन्हा
वाळूज महानगर : रांजणगावात ३० वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या ७ जणांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या राहुल मोगले (रा.ओमसाईनगर) हिला पती व सासरची मंडळी तुला चार मुली असून वाहन खरेदीसाठी पैसे आण असे म्हणून तिचा सतत छळ करीत होते. तिच्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती राहुल मोगले, सासरे सखाराम मोगले, सासू वच्छलाबाई मोगले व इतर ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------
बसच्या धडकेने कारचे नुकसान
वाळूज महानगर : भरधाव व निष्काळजीपणे बस चालवून कारला धडक देऊन नुकसान करणाऱ्या खाजगी बसचालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत्युजंय गोपालचंद्र पात्रा (रा. बजाजनगर) हे शनिवार (दि.५) सकाळी कारने (एम.एच.२०, सी.एस.३२९३) बजाजनगरातून कंपनीत कामासाठी चालले होते. बजाजनगरातील कोलगेट चौकात रांजणगावकडून भरधाव खाजगी बसने (क्रमांक एम.एच.२०, ई.जी.२०५३) पात्रा यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------