वाळूज महानगर : वाळूज येथून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पूसिंग नारायणसिंग शेखावत (रा. गंगापूर) यांनी १९ जुलैला दुचाकी (एम.एच.२०,बी.व्ही.७०२८) वाळूजच्या मच्छी मार्केटसमोर उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
सिडको महानगरात पथदिव्यांची दुरुस्ती
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात बंद पडलेल्या पथदिव्याची सिडको प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. ए.हस.क्लब ते म्हाडा कॉलनी, तीसगाव-वडगाव रोड, सारा व्यंकटेश, ओमप्रकाश स्कूल या मार्गावरील पथदिवे बंदावस्थेत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे गेल्या होत्या. सिडको प्रशासनाकडून या भागातील पथदिव्याची दुरुस्ती करुन पथदिवे सुरु करण्यात आल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
----------------------
नगरोडवरील मलबा हटविण्याचे काम सुरू
वाळूज महानगर : नगररोडवरील गॅस पाईपलाईन खोदकाम केल्यानंतर रस्त्यावरील मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांनी गैरसोय थांबणार आहे. वाळूज ते पंढरपूर या रस्त्यावर गॅस पाईपलाईनसाठी ठिकठिकाणी खोदकाम केल्यानंतर मलबा रस्त्यालगतच पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. या संदर्भात वाहतूक शाखेच्यावतीने खोदकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना मलबा हटविण्याच्या सूचना देण्यात आल्याने दोन दिवसांपासृन मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
------------------------
लिंकरोड चौफुलीवर खड्डे
वाळूज महानगर : लिंकरोड चौफुलीवर धोकादायक खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. लासूरकडून येणारे वाहनधारकांना शहराकडे जाताना वळण घेताना खड्डे दिसून येत नसल्याने या चौफुलीवर अपघाताच्या सतत घटना घडत आहे. या चौफुलीवर धोकादायक खड्डे बुजविण्याची मागणी योगेश गायकवाड, युसूफ शेख, नारायण लोखंडे, आदींनी केली आहे.
--------------------