अक्षय मोहनलाल श्रॉफ (३६, विश्वास भवन, दिवाणदेवडी) यांची मोटारसायकल (एमएच २० एएम ३६९९) घरासमोर उभी केली असता चोरट्यांनी पळविली. श्रॉफ यांनी बुधवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दुसऱ्या घटनेत कुणाल रमेश गोविंदवाड (२०, रा. रोजाबाग) हे त्यांच्या भावासह १२ नोव्हेंबरला रात्री पैठणगेट परिसरात आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच २० ईएम ६५५९) ही पैठणगेट येथे उभी केली असता चोरट्यांनी पळविली.
--===============
६८ हजारांचे मोबाइल चोरीला
औरंगाबाद: बायजीपुरा येथील सिकंदर हॉलमध्ये लग्नसमारंभासाठी शहरात आलेल्या जालना येथील एका व्यक्तीचे ६८ हजारांचे मोबाईल चोरट्यांनी सोमवारी पळविले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेख नासीर शेख नजीर (२५, मणियार मोहल्ला, जालना) हे नातेवाईकाच्या लग्नासाठी शहरात आले होते. सिकंदर हॉलमध्ये ते झोपलेले असताना रात्री चोरट्यांनी त्यांचे ६८ हजार ९६९ रुपयांचे मोबाईल लंपास केले. पोलीस उपनिरीक्षक हारुण शेख हे तपास करत आहेत.