वाळूज महानगर : पंढरपूरात घरासमोर उभी केलेली दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू भारत गिरे (रा.गिरीराज हौसिंग सोसायटी, पंढरपूर) याने मंगळवार (दि.१७) सांयकाळी राहत्या घरासमोर दुचाकी (एम.एच.२३, एम-३६१९) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली. सोनू गिरे याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.
--------------------
कंपनीतून २० हजारांचे झाकण लांबविले
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील जे.एल.मारिसन या कंपनीत नादुरुस्त झालेले २० हजाराचे झाकण लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कंपनीत आठवडाभरापूर्वी ११ के.व्ही.मीटर क्युबीकलमध्ये स्फोट झाल्यामुळे क्युबीलकचे लोखंडी झाकण नादुरुस्त झाले होते. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे झाकण कंपनीत सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. १३ नोव्हेंबरला दुरुस्तीसाठी कर्मचारी आले असता त्यांना कंपनीत झाकण मिळून आले नाही. सर्वत्र शोधाशोध घेऊनही झाकण मिळून न आल्यामुळे कंपनीचे प्लॅन्ट हेड भालचंद्र बोबडे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात २० हजाराचे झाकण चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.
-----------------------
पंढरपूरातून मायलेकी बेपत्ता
वाळूज महानगर : पंढरपूरातून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, कविता विकास गायकवाड (२६) ही मुलगी निकीता (९) हिच्यासह पंढरपूरात वास्तव्यास आहे. मंगळवारी (दि.१७) रात्री १२ वाजेच्या सुमारास कविता ही मुलगी निकीता हिस सोबत घेऊन घरातून बेपत्ता झाली आहे. या दोन्ही मायलेकीचा सर्वत्र शोधाशोध घेऊनही त्या कुठेही मिळून आल्या नाही. या प्रकरणी कविता हिचा भाऊ समाधान माळी याने बहीण व भाची बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
------------------------
महंत काशिकानंद सरस्वती महाराज यांना श्रद्धांजली
वाळूज महानगर : नांदगावच्या भगवान बाबाचे तळे येथील प्राचीन महादेव मंदिराचे महंत काशिकानंद सरस्वती महाराज यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे बजाजनगरात भक्त परिवाराच्यावतीने त्यांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातील महंत काशिकानंद सरस्वती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रवीण विधाते, राजन सोमासे, प्रदीप माळी, मंगेश शेंडकर आदीसह भक्त परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
----------------------