वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाट्यावरून दुचाकी लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीलानंद मुरलीधर मोतीचूर (रा. बजाजनगर) यांनी १४ डिसेंबरला रांजणगावच्या दत्तनगर फाट्यावर दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, डी.के.२४६६) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने तेथून दुचाकी चोरुन नेली.
--------------------------------
पाटोदा परिसरातून वृद्ध इसम बेपत्ता
वाळूज महानगर : औषधी आणण्यासाठी चाललो असे म्हणून घराबाहेर पडलेले एक ७३ वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. देवीदास बापुराव कुऱ्हे (वय ७३ रा.पाटोदा-गंगापूरनेहरी) हे १७ डिसेंबर औषधी आणण्यासाठी चाललो, असे म्हणून घराबाहेर पडले होते. मात्र, अद्यापपर्यंत ते घरी न परतल्यामुळे नातेवाईक विष्णू कुऱ्हे यांनी पोलीस ठाण्यात देवीदास कुऱ्हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
फोटो क्रमांक- देवीदास कुऱ्हे
-------------------
टायगर ग्रुपतर्फे फळे वाटप
वाळूज महानगर : टायगर ग्रुप ऑफ एमआयडीसी-जोगेश्वरीच्या वतीने सावली अनाथआश्रमात फळे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष तान्हाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सत्या जाधव, जुनैद शेख, सर्फराज सय्यद, इम्रान पठाण, एजाज पठाण, गणेश पिंटे, ओमकार शेळके, कृष्णा दाभाडे आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. याप्रसंगी आश्रमातील लहान बालकांना फळे वाटप करण्यात आले.
---------------------
बजाज विहार समोरील खड्डे बुजविले
वाळूज महानगर : सीएट-तिरंगा चौक रस्त्यावरील बजाज विहार समोरील धोकादायक खड्डे बुजविल्यामुळे वाहनधारकांत समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे किरकोळ स्वरुपाचे अपघात वाढले होते. एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावर खडी व डांबर टाकून बुजविल्यामुळे अपघाताचा धोका टळला आहे.
--------------------
बजाजनगरातून इसम बेपत्ता
वाळूज महानगर : बजाजनगरातून एक ४७ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. नितीन मनोहर देशपांडे (रा. जयभवानी चौक, बजाजनगर) हे सुरक्षारक्षक असून १४ डिसेंबरला कंपनीत कामाला चाललो, असे म्हणून घराबाहेर पडले होते. मात्र, अद्यापपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांची पत्नी संगीता देशपांडे यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.