वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत अपघाताचे सत्र सुरुच असून मंगळवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास ट्रकवर धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रांजणगाव फाट्यावर घडली. दरम्यान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जाणारे सहायक फौजदार आर.डी.वडगावकर व अतुल खंडागळे यांना समोरुन येणाºया विना क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिल्याने तेही गंभीर जखमी झाले आहेत.
भागवत किसन कड (रा.पिंपळगाव (कड), ता. जाफ्राबाद , जि.जालना) हा दुचाकीने (एम.एच.२१, ए.ए.५५३०) वाळूज एमआयडीसीतून पंढरपूरच्या दिशेने सुसाट चालला होता. रांजणगाव फाट्यावर समोरुन जाणाºया ट्रकवर (एम.एच.१२, आर.एन.२१२६) धडकला.
यात दुचाकीस्वार भागवत कड याचा जागीच मृत्यू झाला. वाहतूक शाखेचे पोकॉ.शमशुद्दीन कादरी, पोकॉ.एस.टी.शिंदे यांनी तात्काळ नागरिकांच्या मदतीने दुचाकीस्वाराला रस्त्यावर बाजुला केले.
या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, सहायक फौजदार राठोड, पोका.दहीफळे, पोकॉ.राऊतराय, पोकॉ.गरड आदींनी घटनास्थळ गाठुन वाहतुक सुरळीत करीत मयत दुचाकीस्वार टु-मोबाईलने शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आयशर चाकल सुरेश (पूर्ण नाव माहित नाही) याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.