शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

तहसीलमधील लाचखोर लिपिक व दलालास दोन वर्षांची सक्तमजुरी

By admin | Published: July 14, 2015 12:37 AM

औरंगाबाद : तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेतील कनिष्ठ लिपिक सुभाष इरबा माने व दलाल दिलीप सखाराम देहाडे या दोघांनी लाच स्वीकारल्याचे

औरंगाबाद : तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेतील कनिष्ठ लिपिक सुभाष इरबा माने व दलाल दिलीप सखाराम देहाडे या दोघांनी लाच स्वीकारल्याचे सत्र न्यायालयात सिद्ध झाले असून, न्यायालयाने दोघांनाही दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास, अशी शिक्षा ठोठावली. देवळाई चौकात झालेल्या अपघातात रामनाथ नंदू चव्हाण (रा. भिंदोन तांडा) यांचे २८ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले. चव्हाण कुटुंब दारिद्र्यरेषेखालील आहे. त्यामुळे रामनाथ यांच्या पत्नी हिराबाई यांनी राष्ट्रीय कुटुंब साह्य योजनेंतर्गत मदत निधीसाठी ९ जानेवारी २००७ रोजी अर्ज केला होता. हिराबाई यांचा दीर ज्ञानेश्वर चव्हाण हेच या अर्जाचा पाठपुरावा करत होते. तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुभाष इरबा माने यांच्याकडे या योजनेतील १० हजार रुपयांचा धनादेश देण्याचा टेबल होता. ज्ञानेश्वर सतत चकरा मारत होते. दि. १६ एप्रिल २००७ रोजी सकाळी ज्ञानेश्वर तहसील कार्यालयात गेले असता, सुभाष माने याने त्यांना चहा पिण्यासाठी हॉटेलात नेले. त्याच्यासोबत दलाल दिलीप देहाडे हादेखील होता. १० हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी माने याने दीड हजार रुपयांची मागणी केली. ज्ञानेश्वर यांनी गरिबीची परिस्थिती सांगत, याचना केली. तेव्हा देहाडे म्हणाले, दीड हजार रुपये दे अन्यथा धनादेश परत जाईल व तू बस चकरा मारत. यावर ज्ञानेश्वर तयार झाला व उद्या पैसे घेऊन येतो, असे सांगून निघून गेला. ज्ञानेश्वर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी दि. १७ एप्रिल रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ज्ञानेश्वर याने देहाडेकडे दीड हजार रुपये दिले. देहाडेकडील पैसे माने याने काढून घेत, त्यातील ५०० रुपये स्वत:कडे ठेवले व उर्वरित १००० रुपये देहाडेला परत केले. पोलीस निरीक्षक पी. डी. जाधव यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. अतिरिक्त लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी चार साक्षीदार तपासले.