शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

तरुणीस चिरडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 2:09 PM

आरोपी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून कनिष्ठ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे पोलिस अधिकाऱ्याच्या अशा कृत्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आमच्या कर्तव्यात अपयशी ठरु,  खंडपीठाचे निरीक्षण

औरंगाबाद : महाविद्यालयीन तरुणी आकेफा मेहरीन हिच्या अपघाती मृत्यूची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेल्यानंतर अखेर दोन वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटेवर यांच्यावर 'निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत' ठरल्याचा गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या गुन्ह्याचे तपासी अंमलदार साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. खटाणे यांची तत्काळ विभागीय चौकशी करून सक्त कारवाई करण्याचे आदेश न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. २२ एप्रिल २०१९ रोजी पाटेवर यांच्या खासगी कारने टाऊन हॉल उड्डाणपुलावर आकेफाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली होती. उपचारादरम्यान २४ एप्रिल २०१९ रोजी ती मरण पावली होती. याबाबत आकेफाचे वडील मोहम्मद जहीर यांनी ॲड. सईद एस. शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. ११ डिसेंबर २०२० रोजी न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी पोलीस आयुक्तांना या प्रकरणात स्वत: लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ५ जानेवारी २०२१ रोजी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी चौकशी अहवाल सादर करून खटाणे यांनी तपासात गंभीर चुका केल्याचे मान्य केले. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे तसेच खटाणे यांच्याकडून तपास काढून साहाय्यक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर यांच्याकडे सोपविल्याचे म्हटले होते. 

आरोपी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून कनिष्ठ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासी अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखण्याची कारवाई सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. सईद एस. शेख यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सय्यद जाहीद अली यांनी सहकार्य केले; तर शासनाच्या वतीने सरकारी वकील डी. आर. काळे आणि साहाय्यक सरकारी वकील के. एस. पाटील यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस