औरंगाबाद : औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. उदय डोंगरे यांची महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय तलवारबाजी संघटनेचे कोषाध्यक्ष नाशिकचे अशोक दुधारे हे अध्यक्ष असणार आहेत. उस्मानाबादचे राजकुमार सोमवंशी यांची कोषाध्यक्षपदी, तर सोलापूरचे प्रकाश काटुळे यांच्यावर कार्यध्यक्षपदाची धुरा असणार आहे.औरंगाबाद येथे महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत ३५ जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. निवडणुकीत २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी एकूण २५ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. निवडणुकीत निरीक्षक म्हणून राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव प्रकाश तुळपुळे, भारतीय तलवारबाजी महासंघाचे निरीक्षक म्हणून अनघा भुसारे वरळीकर यांनी काम पाहिले. निवडणूक अधिकारी म्हणून सोलापूर येथील सूर्यकांत सरडे होते. त्यांना राज्य संघटनेचे कायदा सल्लागार अॅड. विक्रमसिंह काटुळे यांनी सहकार्य केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांची उपस्थिती होती. निवडण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एक जणाचा कार्यकारिणीत समावेश आहे. त्याचप्रमाणे या कार्यकारिणीत ९ शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत.महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - अशोक दुधारे (नाशिक), कार्याध्यक्ष : प्रकाश काटुळे (सोलापूर), उपाध्यक्ष : चंद्रकांत सोनवणे (जळगाव), शेषनारायण लोढे (बुलडाणा), सुनील करंजकर (भंडारा), विलास वाघ (ठाणे), सरचिटणीस : डॉ. उदय डोंगरे (औरंगाबाद), चिटणीस : डॉ. पांडुरंग रणमाळ (परभणी), अविनाश दुधाने (पुणे), शोएब मोहमद (नागपूर), विनय जाधव (कोल्हापूर), कोषाध्यक्ष : राजकुमार सोमवंशी (उस्मानाबाद), सदस्य : संगीता येवतीकर (अमरावती), कविता महांगडे (सातारा), दत्ता गलाले (गोंदिया), राहुल वाघमारे (नांदेड), गौतम वाघमारे (मुंबई), श्रीकांत देशमुख (जालना), विकास टोणे (यवतमाळ), मनोज धनगर (धुळे), मंजुश्री शिंदे (पालघर), दिलीप घोडके (अहमदनगर), केदार ढवळे (मुंबई उपनगर), सुधीर कहाते (वर्धा).महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सरचिटणीस बशीर अहमद, राज्य आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, राजेंद्र जंजाळ, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष कमांडर विनोद नरवडे, फुलचंद सलामपुरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, एनआयएस प्रशिक्षक संजय भूमकर, महेश तवार, भूषण जाधव, स्वप्नील शेळके, डॉ. संदीप जगताप आदींनी अभिनंदनकेले.आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यावर असणार भरजास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे या हेतूने खेलो इंडियाच्या स्कीमच्या धर्तीवर शासनाच्या मदतीने विविध विभागांत खेळाडूंसाठी ट्रेनिंग सुरू करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. प्रतिक्रिया राज्य संघटनेत सलग दुसºया वर्षी सरचिटणीसपदी निवड झालेल्या डॉ. उदय डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. याआधी डॉ. उदय डोंगरे यांनी सरचिटणीसपद भूषवताना विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात तलवारबाजी खेळाचा समावेश करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे राज्य संघटनेतर्फे २५ लाखांचे साहित्य खरेदी केले, तसेच ८ जिल्ह्यात त्यांनी तलवारबाजी खेळाचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.तसेच महाराष्ट्रात ११ राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजनही त्यांच्या कारकीर्दीत करण्यात आले आहे. २००८ मध्ये खेळाडू आणि २०१४ मध्ये मार्गदर्शक असा दोनदा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उदय डोंगरे यांनी गतवर्षी आॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तलवारबाजी संघाचे संघ व्यवस्थापकपद भूषवले आहे. तसेच गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात कॅनबेरा येथील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्याचप्रमाणे पोलंड, तैवान, सिंगापूर, चीन, व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेतही त्यांनी प्रशिक्षकपदाची भूमिका यशस्वीपणे बजावली आहे.
उदय डोंगरे राज्य तलवारबाजी संघटनेच्या सरचिटणीसपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:12 AM
औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. उदय डोंगरे यांची महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय तलवारबाजी संघटनेचे कोषाध्यक्ष नाशिकचे अशोक दुधारे हे अध्यक्ष असणार आहेत. उस्मानाबादचे राजकुमार सोमवंशी यांची कोषाध्यक्षपदी, तर सोलापूरचे प्रकाश काटुळे यांच्यावर कार्यध्यक्षपदाची धुरा असणार आहे.
ठळक मुद्देनवीन कार्यकारिणी जाहीर : अशोक दुधारे अध्यक्षपदी, उस्मानाबादचे राजकुमार सोमवंशी असणार कोषाध्यक्ष