लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोरेगाव भीमा प्रकरण अचानक घडलेले नाही, तर सरकारच्या माध्यमातून मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी पूर्वनियोजित कट रचून घडवून आणलेले आहे. अशा लोकांना छत्रपती उदयनराजे यांनी पाठीशी घालून नवीन वाद निर्माण करू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडने प्र्रसिद्धी पत्रकातून केले आले.कोरेगाव भीमा प्रकरणामागे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे हिंदुत्ववादी नेते असल्याचा आरोप अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. याप्रकरणी विविध ठिकाणी भिडे आणि एकबोटेविरूद्ध गुन्हे नोंद झाले. असे असताना उदयनराजे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, उदयनराजे हे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत. आम्ही त्यांचा सन्मान करतो, परंतु त्यांनी छत्रपतीच्या पदाचा दुरुपयोग करू नये, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. कोरेगाव भीमा येथे २०० वर्षांपासून जाणाºया दलित बांधवांचे मराठा बांधव आदरातिथ्य करीत होते. तेथील इतिहासाबद्दल खोटे सांगण्याचे काम भिडे आणि एकबोटे करीत आहेत, यामुळे जातीय दुरावा निर्माण झाला. भिडे आणि एकबोटे यांनी वढू बु., कोरेगाव भीमा आणि परिसरातील गावांमध्ये गैरसमज निर्माण केला. असे असताना छत्रपतींच्या पदावरील व्यक्तीने त्यांना पाठीशी घातल्यामुळे विघातक प्रवृत्तीचे धाडस वाढते. भिडेंनी आजपर्यंत बहुजन तरुणांची डोकी भडकावून दंगली घडवून आणल्या, यामुळे त्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपतींनी सातारा सोडून वढू बु., कोरेगाव भीमात फिरून गैरसमज दूर करावा, आम्हीही तुमच्या सोबत येतो, असे म्हटले आले.
उदयनराजेंनी एकबोटे, भिडे यांना पाठीशी घालू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:35 AM
कोरेगाव भीमा प्रकरण अचानक घडलेले नाही, तर सरकारच्या माध्यमातून मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी पूर्वनियोजित कट रचून घडवून आणलेले आहे. अशा लोकांना छत्रपती उदयनराजे यांनी पाठीशी घालून नवीन वाद निर्माण करू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडने प्र्रसिद्धी पत्रकातून केले आले.
ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचे आवाहन : पदाचा दुरूपयोग नको