शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

उदगीर, जळकोटचे प्रकल्प तहानलेलेच !

By admin | Published: October 26, 2014 11:45 PM

उदगीर/जळकोट उदगीर व जळकोट तालुक्यात यंदा झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे पाण्याची ओरड सुरु झाली आहे़ तिरु प्रकल्प वगळता या दोन्ही तालुक्यातील एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही़

 उदगीर/जळकोटउदगीर व जळकोट तालुक्यात यंदा झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे पाण्याची ओरड सुरु झाली आहे़ तिरु प्रकल्प वगळता या दोन्ही तालुक्यातील एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही़ लघु तलावांमध्ये खरडण लागली आहे़ त्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण होत आहे़उदगीर तालुक्यातील हेर, हाळी-हंडरगुळी हा पट्टा वगळता इतर क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही़ या पट्ट्यातही पूर्वा नक्षत्राच्या सुरुवातीलाच एका दिवसात मोठा पाऊस झाला़ त्यातील बहुतांश भाग तिरु प्रकल्पाच्या क्षेत्रात येत असल्याने तिरु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे़ आजघडीला या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ प्रकल्पाची क्षमता १५़२९ इतकी आहे़ सध्या त्यात इतकेच पाणी उपलब्ध आहे़ परंतु, तालुक्यातील दुसरा मध्यम प्रकल्प देवर्जन मात्र रिता-रिता आहे़ या प्रकल्पाची क्षमता १०़६८ दलघमी इतकी असताना आजघडीला त्यात केवळ ४़२ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ ज्याची टक्केवारी ४० टक्के इतकीच आहे़ उदगीर तालुक्यात १२ लघु तलाव आहेत़ त्यांची क्षमता २३ दसलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची असताना यंदा झालेल्या कमी पावसामुळे सध्या ९़५ दलघमी इतकाच साठा झाला आहे़ त्यातही अध्यापेक्षा अधिक तलाव कोरडेठाक पडले आहेत़जळकोट तालुक्यात एकूण १५ लघु तलाव आहेत़ त्यांची क्षमता ३१़५ दलघमी पाणी साठविण्याची आहे़ परंतु, त्यातही सध्या ७़७ दलघमी इतकेच पाणी उपलब्ध आहे़ ढोरसांगवी, सोनाळा, धोंडवाडीचे तलाव पूर्णपणे कोरडे आहेत़ त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई उदगीर व जळकोट तालुक्यात जाणवत आहे़गेल्या सहा वर्षांत तिरु मध्यम प्रकल्प चार वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे़ २०१०, २०१२, २०१३ व यंदा प्रकल्प १०० टक्के भरले़ परंतु, २००९ साली मात्र त्यात एक थेंबही पाणी नव्हते़ २०११ मध्ये या प्रकल्पात १२़७४ दलघमी पाणी उपलब्ध होते़ देवर्जन मध्यम प्रकल्प मात्र सहा वर्षांत २०१० व २०११ या दोन वर्षीच पूर्ण क्षमतेने भरला़ २००९ मध्ये या प्रकल्पालाही कोरड लागली होती़ २०१२ मध्ये केवळ ३़१३ तर २०१३ मध्ये ८़६७ दलघमी इतके पाणी होते़